Saturday, February 22, 2020

मु.पो. नाधवडे ( खंडवाडी ) ,तालुका -वैभववाडी , जिल्हा -सिंधुदुर्ग , येथील घटना ,

बघा महसूल विभागाच्या तोकड्या नियमांमुळे आणि संथ गतीने होणाऱ्या कार्यवाही चे स्थानिक भूमाफिया कसे फायदा उचलतात ते .

चार वर्षा पूर्वी या ठिकाणी माझ्या मालकी हक्काच्या जागेत माझी खानावळ ( हॉटेल ) चालू होते , जागा राज्यमहामार्गास लागून असल्यामुळे एका  स्थानिक वाळूव्यवसायिकाने ती जागा मागितली पण मी नकार दिला ,.

मी नकार दिल्या मुळे त्याने माझ्या जमिनी लागतं असलेली ४ गुंठे जागा २०१५ साली विकत घेतली आणि जमिनीची मोजणी न करताच आम्ही कोणी घरी नसताना  कुंपण घातले आणि कुंपण ही असे घातले की माझ्या हॉटेलचा रस्ता बंद होईल असे कुंपण घातले , मी जर ते कुंपण काढले असते तर माझ्यावर नक्की पोलिस कार्यवाही झाली असती कारण ह्या वाळूव्यवसायिकांचा या ठिकाणी चांगलाच दबदबा असून असे प्रकार यांना नवीन नाहीत .


 अनेक वेळा तक्रारी केल्या नंतर तहसीलदार वैभववाडी यांच्या मार्फत चौकशी होऊन दिनांक १४ /०२/ २०१८ रोजी त्या वाळूव्यवसायिकाला आपली जमीन मोजणी करून घेण्याचा आदेश देण्यात आला , पण तो आदेश त्याला मिळालाच नाही असे त्या वाळूव्यवसायिकाने वैभववाडी पोलिसात दोन वेळा दिलेल्या जबानीत सांगितले

शेवटी माहिती अधिकारा मार्फत त्याला २ वर्षा पूर्वी  मिळालेल्या तहसीलदार यांच्या आदेशाच्या प्रतीची  पोच पोलिसात सादर करताच त्याने दिनांक ०१ / ०१ /२०२० रोजी जमीन मोजणी अर्ज दाखल केला या बद्दल मी वैभववाडी पोलिसांचे आभार मानतो ,.


दिनांक १५ / ०२/२०२० रोजी मोजणी झाली खरं खोट समोर आल या वाळू व्यावसायिकाने मागील साडेतीन वर्षांपासून  जाणीवपूर्वक  माझा रस्ता बंद केला हे या जमीन मोजणी अंती सिद्ध झाले ,


मोजणी झाल्या नंतर तरी हा वाळू व्यावसायिक माझा रस्ता मोकळा करील की नाही ? जरी रस्ता मोकळा केला तरी   महसूल विभागाच्या तोकड्या कायद्या मुळे या वाळूव्यवसायिकाने जो मला मनस्थाप दिला व मागील साडेतीन वर्षांपासून जे माझे आर्थिक नुकसान झाले त्याची भरपाई मला मिळालीच पाहिजे.

        या वाळूव्यवसायिकां सारखे भूमाफिया सामान्य जनतेला त्रास देतात , आपल्या पैश्याच्या आणि ओळखीच्या जोरावर हे अनेकांच्या जमिनी लाटतात , यांना माहित असते आपण ज्यांच्यावर अश्या प्रकारे अन्याय करू त्या पैकी % लोकच माझ्यासारखा पाठपुरावा करून सत्य समोर आणतात  बाकी सर्व कोर्टकचेऱ्या करून शेवटी आपल्या मालमत्तेवर पाणी सोडतात ,आणि जरी सत्य समोर आलं तरी यांच्यावर कोणतीही कार्यवाही होत नाही म्हणून हे बिनधास्त असतात .

एखादा सुज्ञ व्यक्ती जेव्हा आपल्या जमिनीला कुंपण घालतो तेव्हा तो लगत जमीन मालकांचे वाद उद्भवू नये म्हणून आपल्या जमिनीची रीतसर मोजणी करतो नंतरच आपल्या जमिनीला कुंपण घालतो, पण एखाद्याला जर दुसऱ्याची जमीन लाटायची आहे तर तो जमिनीची मोजणी करताच कुठेही कुंपण टाकतो म्हणजे जमिनीची मोजणी करता कुंपण घालणारा व्यक्ती हा १००% भूमाफियाच असतो .

म्हणून माझी शासना कडे विंनती आहे की अश्या भूमाफियांन वर कडक आणि दंडनीय कार्यवाही व्हवी जेणेकरून  भविष्यात हे भूमाफिया अश्या प्रकारे परत  गुन्हा करणार नाहीत. संबंधित विभाग माझ्या या निवेदना कडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन कार्यवाही करेल अशी आशा बाळगतो .
 “ सध्य परिस्थितीचा विडिओ सोबत जोडत आहे .”

धन्यवाद
दिपक महादेव बांदिवडेकर
९८९२३५८२६२


No comments:

Post a Comment